Breaking

पुणे : जुन्नर तालुक्यात अवैध दारू धंद्यांवर पोलिसांच्या धाडी, सहा जणांवर कारवाई !


जुन्नर : गेल्या दोन तीन दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी जुन्नर पोलिसांनी अवैध दारू धंद्यांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये दि. १७ रोजी पोलिसांनी दारूसह दारू तयार करण्याचे रसायन व साहित्य जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या आदेशानुसार अवैध दारू धंद्यांवर कारवाई केली आहे.

बेकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टीची तयार करुन त्याची चोरुन विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती, त्यावरून पोलिसांनी १७ मार्चपासून जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या. यात पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना जागीच पकडले आहे. केलेल्या या कारवाईमध्ये ६ जणांवर कारवाई करण्यात आली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

तसेच, शिरोली विघ्नहर सहकारी साखर कारखान्या जवळ देखील एक इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळवित असल्याच्या प्रकरणावरून कारवाई करण्यात आली आहे.


विविध कारवाईतील आरोपी पुढीलप्रमाणे :

१. केवाडी येथील रामदास भाऊ निर्मळ (वय.38 वर्षे) रा. केवाडी ता. जुन्नर जि. पुणे.

२. परीटवाडी येथील चंद्रकांत भगवान भागवत (वय.42 वर्षे), रा.परीटवाडी, ता.जुन्नर, जि.पुणे.

३. सावरगाव येथील जगदिश दामोदर जाधव (वय.48 वर्षे) रा.सावरगाव, ता.जुन्नर, जि.पुणे. 

४. काचळवाडी येथील साईनाथ राजेंद्र केदार (वय.25 वर्षे) रा.काचळवाडी, ता.जुन्नर, जि.पुणे.

५. निमदरी येथील बाळु शंकर केवळ (वय.44 वर्षे)  रा.निमदरी ता.जुन्नर जि.पुणे

६. निवाडे येथील लिंबा लक्ष्मण शेऴकंदे रा.भिवाडे ता.जुन्नर जि.पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा