Breaking


रशिया - युक्रेन युद्ध : पुतीन यांचा युरोपला दणका, रुबल मध्येच पैसे स्वीकारले जातील


मास्को : अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले, तेच युरोपियन 28 देश युक्रेन युद्ध सुरू असूनही रशियाकडून नैसर्गिक वायू,क्रूड खरेदी करत आहेत. जर्मनी, फ्रांस, इटली सह 28 युरोपियन देश रशियन इंधन वायू कंपन्यांचे मोठे ग्राहक आहेत. यातील प्रमुख देशांनी रशियन बँक, सोने व्यवहारावर निर्बंध घालून रशियाची कोंडी केली आहे. 


त्यामुळे पुतिन यांनी निर्णय घेतला आहे की, युरोपियन संघ आणि अमेरिकेने रशिया बरोबर कोणताही खरेदीचा व्यवहार केल्यास डॉलर, युरो हे चलन स्वीकारले जाणार नाही. गॅस, क्रूड साठी आता रशियाच्या रुबल या चलनाद्वारे पैसे स्वीकारले जातील.


रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले की, या देशांच्या धोरणानंतर उपाय म्हणून गैर-मित्र देशांसाठी चलन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुतिन यांनी सेंट्रल बँकेला नैसर्गिक वायू खरेदीदारांना रशियामध्ये रुबल मिळविण्यासाठी एक धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, नवीन धोरण कधीपासून प्रभावी होईल नाही. 

पुतिन यांच्या घोषणेनंतर जगातील अनेक अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुतिन यांच्या या निर्णयामुळे रशियाचे चलनाला अधिक समर्थन मिळेल. युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाचे चलन अन्य देशांच्या चलनाच्या तुलनेत मागे पडले आहे. या निर्णयामुळे रुबलचे मूल्य वाढणार आहे. युरोपियन देश 40 टक्क्यांहून जास्त गॅस, क्रूड रशियाकडून खरेदी करतात.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा