जलसंपदा विभागात "या" महिन्यामध्ये 3000 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती
मुंबई : राज्यात जलसंपदा विभागात 4 हजार 75 पदे रिक्त असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 करिता विभागाकडून पाठविण्यात आलेल्या 581 पदांकरिता ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 करिता 117 पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. पण या परीक्षांमधून आयोगास अद्याप उमेदवारांच्या शिफारशी विभागाकडे प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांसाठी एप्रिल 2022 मध्ये जलसंपदा विभागातील विविध रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा