Breaking


उंबराच्या झाडावर महिलेचा कुजलेला मृतदेह, घातपात कि अंधश्रद्धा ?


पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत मुळा नदीलगत असलेल्या एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


सविस्तर वृत्त असे की, हिंजवडीजवळील माण येथे मुळा नदीकाठी असलेल्या एका झाडावर २० ते २३ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह 20 फूट उंचावर उंबराच्या झाडावर नेऊन ठेवलेला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


तर उंबराच्या झाडावर मृतदेह ठेवलेला असल्यामुळे अंधश्रद्धेपोटी अघोरी प्रथेमुळे महिलेचा बळी गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे तपास यंत्रणेला  आव्हानात्मक ठरणार आहे. 

सध्या मृतदेह झाडावरून काढून तो वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करण्याच्या सुचनाही आयुक्त आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा