Breaking

एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे आवाहन, घेतले महत्वपूर्ण निर्णय


मुंबई : संपकरी एस.टी. (ST Strike) कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च, २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी (ST Workers Agitation) कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज दोन्ही सभागृहात केले. 


तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय पुढीलप्रमाणे :

- एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८ % करण्यात आला.

- घरभाडे भत्ता ७ %, १४ % २१ % वरुन ८ %, १६ % आणि २४% टक्के करण्यात आला.

- कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवाकालावधीनुसार रुपये ५०००, रुपये ४००० व रुपये २५०० अशी वाढ.

- पगार महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने ग्वाही.

 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यास कोणीही बंदी घातलेली नाही. त्यांच्यावरील निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती या सारख्या कारवाया आम्ही मागे घेतल्या आहेत. त्यामुळे ३१ मार्च, २०२२ पर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे असं आवाहन ठाकरे सरकारनं केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा