Breaking

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदेव गावडे यांचे निधन !


कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ व राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य‌ तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉ. नामदेव गावडे यांचे रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. गेल्याच महिन्यात अँजिओप्लास्टी झालेली होती.


कॉ. गावडे हे कोल्हापूर पासून १४ - १५ किलोमीटर असलेल्या 'बीड' या गावचे होते. ते कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनही राहिले होते. गेली 32 वर्ष ऑल इंडिया स्तुडेंट फेडरेशन(AISF) ऑल इंडिया युथ फेडरेशन(AIYF) चे नेतृत्व करताना, ते सध्या किसान सभेचे (AIKS) चे काम करत होते.


शेतकरी प्रश्न कर्जमुक्ती चा असो, समृध्दी महामार्ग बाधित शेतकरी लढा 10 जिल्ह्यातील एकत्र करण्यासाठी केलेली यात्रा, शेतकरी संप नंतर सुकाणू समिती शेतकरी चळवळ आदींसह जनतेच्या प्रश्नांवर ते नेहमी अग्रेसर असत. त्यांनी 20 पेक्षा अधिक शेती प्रश्न वर पुस्तिका लिहिल्या. अनेक लेख लिहून शेतकऱ्यांना लढण्याचे बळ दिले. 

"सहकार चळवळ बळकट झाली तरच शेतकरी वाचेल अशी आग्रही भूमिका घेऊन ते प्रबोधन करत होते. आपल्या अचानक पणे जाण्याने अतीव वेदना होत आहेत. किसान सभा महाराष्ट्र, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक च्या वतीने आपल्याला लाल सलाम करतो. आपण पाहिलेले वर्गविहिन, जात विहिन समाजनिर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी. तसेच शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी, हमी भाव चा कायदा करण्यासाठी लढत तीव्र करू.'

- राजू देसले, राज्य सचिव मंडळ सदस्य
   भारतीय कम्युनिस्ट पक्ष


"कॉ. गावडे विद्यार्थी दशेपासून जनतेच्या लोकशाही, धर्मनिरपेक्ष चळवळींचा अतूट भाग होते. ऐंशीच्या दशकात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी डाव्या चळवळीत प्रवेश केला. त्या काळात राजीव गांधी सरकारने उच्चभ्रूंना झुकते माप देणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात डाव्या विद्यार्थी संघटनांनी उभारलेल्या लढ्यात त्यांचा लक्षणीय सहभाग होता. तेव्हापासून कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील डाव्या, पुरोगामी आंदोलनात ते अग्रभागी राहिले.

उजव्या धर्मांध फॅसिस्ट शक्तींनी केलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापुरातील भाकप वर झालेला हा दुसरा मोठा आघात आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य कमिटी कॉ. गावडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असून त्यांचे कुटुंबीय आणि भाकपच्या सर्व कार्यकर्त्यांना या दुःखद प्रसंगी त्यांची सोबत करण्याची ग्वाही देत आहे. 

- डॉ. उदय नारकर, राज्य सरचिटणीस
  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा