Breaking

किसान सभेचे ज्येष्ठ नेते कॉ. बारक्या मांगात यांचे निधन


पालघर : किसान सभेचे ज्येष्ठ नेते कॉ. बारक्या मांगात यांचे आज ३१ मार्च रोजी सायंकाळी वापी येथील इस्पितळात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक दुःखद निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी पोटाच्या कर्करोगासाठी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची प्रकृती चांगली सुधारत असतानाच ही घटना घडली. त्यांच्या पत्नीचे निधन गेल्या वर्षीच झाले होते. त्यांच्यामागे एक मुलगा, तीन मुली व त्यांचे परिवार आहेत.


शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एसएफआय कडून ई-मेल करो आंदोलन


कॉ. बारक्या मांगात हे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे ते गेली अनेक वर्षे राज्य उपाध्यक्ष होते. तसेच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवमंडळाचे सदस्य राहिलेले होते. सप्टेंबर २०१४ ते मार्च २०२२ या सुमारे ८ वर्षांच्या काळात पक्षाच्या ठाणे-पालघर जिल्हा सेक्रेटरीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. ठाणे जिल्हा परिषदेचे ते पूर्वी अनेक वर्षे सदस्य म्हणून निवडून आले होते आणि तलासरी पंचायत समितीचे ते पूर्वी सभापती म्हणून निवडून आले होते.


एसटी महामंडळाच्या पुनर्बांधणी, पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला “हा” महत्वाचा निर्णय


उद्या दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव पक्षाच्या तलासरी येथील जिल्हा कार्यालयावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि दुपारी १ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.


व्हिडिओ : अतिरिक्त ऊस व एफ.आर.पी. प्रश्नी किसान सभेची साखर आयुक्तांची बैठक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा