Breaking


शिवयोद्धा प्रतिष्ठाणतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी !


पिंपरी चिंचवड : शिवयोद्धा प्रतिष्ठाण, रुपीनगर, तळवडे यांनी सालाबादप्रमाणे याहीवर्षी आदर्श अशी शिवजयंती साजरी केली. नेहमीप्रमाणे डॉल्बी-डीजे यांना फाटा देऊन पहाटेच्या मंगलमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने शिवरायांची पालखी मिरवणूक रुपीनगर मध्ये काढण्यात आली. तत्पूर्वी प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी किल्ले शिवनेरीवरून शिवज्योत आणली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत युवक व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. 


संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची लोककला असलेले भारुड सादर करण्यात आले. राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद यांनी शिवचरणी भारुडसेवा सादर केली. लोप पावत चाललेली भारुड कला पाहून उपस्थित प्रेक्षक आणि शिवभक्त यांनी कार्यक्रमाला दाद दिली. 

प्रतिष्ठाण चे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अशाच प्रकारे एक आदर्श शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येतो. "छत्रपती शिवरायांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या कार्यक्रमातून शिवरायांचे विचार व इतिहास यांचा समाजामध्ये प्रसार व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो," असे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी सांगितले.

भोसरी विधानसभा प्रथम आमदार विलास लांडे पाटील प्रसंगी राष्ट्रवादी कॉ.शहराध्यक्ष अजित गव्हाणे, दत्तात्रय गवारे महाराज, शांताराम भालेकर, वसंत पतंगे, धनाजी भालेकर, मा.नगरसेवक प्रविण भालेकर, पंकज भालेकर, पोर्णिमाताई सोनवणे, संगिता ताम्हाणे, आशाताई भालेकर, सुजाता काटे, ह.भ.प.संगिताताई भालेकर, शितलताई पवार, तानाजी काळभोर, शांताराम कोंडिबा भालेकर, सुरेश म्हेत्रे, शरद भालेकर, विशाल मानकरी, सागर चव्हाण, दादा नरळे, 


किरणशेठ पाटील, विलास भालेकर, अरुण वाळुंजकर, अनिल भालेकर, रामदास कुटे, प्रमोद भालेकर, दिपक जाधव, बंटी सगळे, सतिष कंठाळे, रघुनंदन घुले, निलेश भालेकर, गोवर्धन चौधरी, गौतम दळवी, रामभाऊ भालेकर, भाऊसाहेब काळोखे, दौलत कुटे, तुकाराम भालेकर, विकास भालेकर, सुखदेव म्हस्के, अरुण थोपटे, आयाज शेख, के.डी.वाघमारे, अनिल भोसले, बाप्पुसाहेब गौंड, पद्माकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवयोद्धा प्रतिष्ठ‍ाणचे कार्यकर्त्यांनी केले. सुत्रसंचालन शिवव्याख्याते शुभमजी खेडेकर यांनी केले.

- क्रांतिकुमार कडुलकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा