Breaking

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सह्यांची मोहीम - SFI


सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - (एसएफआय) सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील हिवाळी 2021 - 22  सेमिस्टर परीक्षा बॅक या प्रमुख मागणी सोबतच महाविद्यालयातील परिसर स्वच्छता प्रश्न, पिण्याचे पाणी प्रश्न, कॅंटीनचे दुरावस्था (उपहारगृह) मुलींचे वस्तीगृह, मुलांचे वस्तीगृह, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल चे साहित्य, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर लॅब, टेकस्टाईल विभाग अशा सर्व विभागाच्या मागण्यांना घेऊन एसएफआय कडून महाविद्यालयात सह्यांची मोहीम घेण्यात आली.


इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल,  मेकॅनिकल, कम्प्यूटर्स, टेक्स्टाईल असे सर्व विभागाचे मशीन्स खूप जुन्या आणि बऱ्याच बंद पडलेले आहेत. एम.एस.बी.टी.ई  ने लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करून निकाल जाहीर करावे. ही अपेक्षा देखील उपस्थित काही विद्यार्थीनी - विद्यार्थी देखील आपली मत मांडली आहेत. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील हिवाळी 2021 - 22 परीक्षा सेमिस्टर बॅक विद्यार्थ्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने सह्यांच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

यावेळी एसएफआयचे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वजित बिराजदार, जि.क.सदस्य दत्ता हजारे, प्रसन्न शिवणकर, गणेश लोखंडे, साक्षी रोंगे, शीतल प्रक्षाळे, कृष्णा उगळे, सागर धर्मसाले, नितीन कमळे, वैशाली मोरे, रोहित खुने, रिहान सय्यद, सुहास झिझुरटे, शैलेश लोकरे, विश्वजीत क्षीरसागर इ. सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा