Breaking

सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शहीदांना अभिवादन !


सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) सोलापूर जिल्हा कमिटी वतीने 23 मार्च शहिद दिन SFI कार्यालय मध्ये साजरा करण्यात आले. 


यावेळी शहिद भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेस जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव व यंत्रमाग कामगार संघटनेचे नेते कॉ. व्यंकटेश कोंगारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


या वेळी कॉ. कोंगारी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी घेऊन कसं लढायचं, भगतसिंगांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. आज युवकानी या देशासाठी योगदान देणं खूप गरजेचे आहे. शहिदांच्या प्रत्येक रक्तातील थेंबाची आपल्याला युवकांना जाणीव करून दिली पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्याला भरपूर प्रश्नांवर आंदोलन उभे करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी यंत्रमाग कामगार संघटनेचे कॉ.किशोर मेहता, कॉ.शहाबुद्दीन, SFI माजी जिल्हा सचिव मीरा कांबळे, जिल्हा कमिटी सदस्य दत्ता हजारे, प्रशांत आडम, रोहित सावळगी, प्रभुदेव भंडारे, गणेश भोईटे, तौसीद कोरबू, गुरुनाथ पाताळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा