Breaking


दरवर्षी तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची “यांनी" केली घोषणा


पणजी : गोव्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजपच्या सरकारने राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील प्रत्येक कुटुंबाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार नवीन मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत वर्षभरात तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. 


मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी गोव्याच्या नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली, त्यावेळी दरवर्षी तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची घोषणा सावंत यांनी केली. सावंत यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि इतर आठ मंत्र्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. 


इंधन दरवाढीमूळे सरकार विरोधात महिला नेत्या आणि गृहिणी तीव्र संतापल्यामुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या बैठकीची अध्यक्षता केली. भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार नवीन आर्थिक वर्षापासून तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना मंत्रिमंडळाने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ


इंधन दरवाढीमूळे सरकार विरोधात महिला नेत्या आणि गृहिणी तीव्र संतापल्या


“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून पटोले यांची टीका


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा