Breaking

वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना


मुंबई : वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.


बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव येथे वाळू माफियांतर्फे वाळू वाहतूक विरोध केल्याने एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य बबनराव लोणीकर यांनी प्रश्न उपस्थित केला. 


विद्यार्थ्याने केला रिचार्जेबल सोलर सायकल विकसित केल्याचा दावा, पहा कशी आहे सायकल !


या प्रश्नाला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव मध्ये 11 जानेवारी 2022 रोजी या विषयासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून. यामध्ये तीन आरोपी आहेत.त्यांचा पोलिसांनी तपास केला असता ते कुठेच सापडले नाहीत. हे आरोपी फरार असल्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही. त्याचदरम्यान आरोपींनी अंतरिम जामीन घेतला आहे.अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलीस विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल.तसेच वाळू तस्करीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस विभागाकडून नेहमीच महसूल विभागाला सहकार्य केले जाते. 


पोलीस विभाग व महसूल या दोन्ही विभागांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात यासाठी या दोन्ही विभागाची संयुक्त बैठक बोलविण्यात येईल असेही राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.


धक्कादायक ! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, १७ वर्षीय आरोपी अटक तर दोन फरार


भाजप आमदारांचे विधानसभेबाहेर निदर्शने, केली 'ही' मागणी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा