Breaking

शालेय विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद, तर मधान्ह भोजनाऐवजी विद्यार्थ्याना रोख रक्कम ?


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी उपयोजन क्षेत्राव्यतिरिक्त राज्याच्या अन्य भागातील अनुसूचित जाती व जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील दारिद्रयरेषेखालील विद्यार्थिनींसाठी सन 1992 साली उपस्थिती भत्ता म्हणून  1 रूपया  देण्याची योजना होती. आता ही योजना कालबाह्य झाली असल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या की, काळानुरूप योजनेत बदल करण्यात आले असून शाळेत विद्यार्थिनींची होत असलेली गळती थांबविण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, याबाबत शासन सकारात्मक आहे. तसेच मधान्ह भोजनाऐवजी विद्यार्थ्याना रोख रक्कम देण्याबाबतही विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य विजय उर्फ भाई गिरकर, सतिश चव्हाण, सदाशिव खोत यांनी विचारला होता.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा