Breaking

महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला, “या” जिह्यात उष्माघाताचा पहिला बळी


जळगाव : गेल्या काही दिवसांत हवेच्या बदललेल्या पॅटर्नमुळे महाराष्ट्रासह देशात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. भारतातील अनेक शहरात उन्हाचा चटका वाढला असून नागरिक हवालदिल झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमान 41 अंशाच्या वर गेले असून अशातच जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे.


राज्यातील "या" जिल्ह्यांना पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा


जळगावमधील अमळनेर तालुक्यातील मांडळ इथे शेतात काम करून घरी परतत असताना उष्माघातामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जितेंद्र संजय माळी (वय 33) असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जितेंद्र माळी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले आणि त्यानंतर शेतात कामाला गेले होते. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याने जितेंद्र माळी यांचा मृत्यू झाला असं स्थानिक डॉक्टरांचे म्हणणं आहे.


आरोग्य सल्ला : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !


दरम्यान, जितेंद्र माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर योग्य तो खुलासा होईल.


आरोग्य सल्ला : रणरणत्या उन्हात अशी घ्या त्वचेची काळजी !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा