Breaking

महाराष्ट्र विधान परिषदेतून १० सदस्य निवृत्त !

 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा सदस्य लवकरच निवृत्त होत असून या सर्व सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.


राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू असून या वर्षी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे एकूण १० आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत जून व जुलै महिन्यात संपत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे ठाण्याचे आमदार रवींद्र फाटक यांची मुदत ८ जून २०२२ रोजी संपत असून अन्य ९ आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२० रोजी संपत आहे. मुख्य म्हणजे सभापती रामराजे निंबाळकर, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची सुद्धा सदस्यत्वाची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. यासर्व सदस्यांना परंपरेनुसार विधिमंडळाच्या प्रांगणात फोटो सेशन करून निरोप समारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होते.


केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगारांचा 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संप !


कुठल्या पक्षाचे किती सदस्य


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - १) रामराजे प्रतापसिंह नाईक- निंबाळकर, २) संजय पंडितराव दौंड.


शिवसेना - १) रवींद्र सदानंद फाटक, २) सुभाष राजाराम देसाई, ३) दिवाकर नारायण रावते.


भारतीय जनता पार्टी - १) प्रविण यशवंत दरेकर, २) सदाशिव रामचंद्र खोत, ३) सुजितसिंग मानसिंग ठाकूर, ४) विनायक तुकाराम मेटे, ५) प्रसाद मिनेश लाड.


गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती


जाणून घ्या ! रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे


आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !


निर्बंधमुक्त भारत ! 31 मार्च नंतर कोणताही नवा आदेश नाही केंद्राचे सर्व राज्यांना पत्र !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा