Breaking

महापालिका क्षेत्रीय जनसंवाद सभांमध्ये प्रशासन आणि नागरिक यांच्यात तणाव


पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या वतीने सोमवार २८ मार्च रोजी जनसंवाद क्षेत्रीय सभा जाहीर केली होती. परंतु प्रशासनाने अचानक त्यात बदल केला व एका व्यक्तीस आत घेऊन निवेदन स्विकारून चर्चा करण्यात आली ही जनतेची फसवणूक आहे, असा आरोप करत  उपस्थितीत नागरिकांनी घोषणा देऊन निवेदने फाडून जाहीर निषेध केला. नागरिकांचा रोष बघून प्रशासनास सुरक्षा रक्षक व पोलीस पाचारण करावे लागले. 


चिंचवड येथील ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या वादाबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे म्हणाले की, बंद खोलीत नागरिक संवाद सभा कशी होऊ शकते. लोकांच्या समस्या सोडवण्यावर प्रशासनाचा भर असला पाहिजे, पण हा फक्त दिखावा आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


मधुकर बच्चे, सदस्य महाराष्ट्र महावितरण समिती आणि भाजप कार्यकर्त्या रोहिणी बच्चे यांच्या वतीने प्रभाग १८ केशवनगर, तानाजी नगर चिंचवड भागातील काही महत्वाच्या समस्या उपस्थित करण्यात आल्या.

नागरिकांचे मुद्दे खालीलप्रमाणे :

१) पाण्याचा प्रश्न गंभीर असूनही संबंधित आधिकारी निष्काळजी पणे रहाताना जाणवतात.

२) शनी मंदिर ते पोदार शाळा डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या अनेक तक्रारी येऊनही त्याकडे दुर्लक्ष.

३) गेल्या ३ महिन्यांपासून मच्छर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.


४)अनेक ठिकाणचे फुट पाथ योग्य वेळी दूरस्थ न केल्यामुळे त्याचा नागरिक व व्यायासायिक लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

५) कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. लोकांना दहशतीचे वातावरण झाले आहे. अनेकदा कुत्रे चावल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, आदी समस्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.


ब' प्रभागातील अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून आधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदने दिली. तसेच पुढील संवाद सभा नागरिकांच्या सोयी प्रमाणे समस्या निवारण होतील आशा प्रकारे क्षेत्रीय सभा घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा