Breaking

इंधन दरवाढीमूळे सरकार विरोधात महिला नेत्या आणि गृहिणी तीव्र संतापल्या


पुणे : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 114  रुपये लिटर डिझेल 99 रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे सरकार विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या इंधन दरवाढीवर महिला कार्यकर्त्या आणि गृहिणींनी दिलेल्या प्रतिक्रिया…


गोर गरीब श्रमिकांना स्वयंपाक महाग केला आहे.


युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती ती आज 37 रुपये म्हणजे 285 टक्के आहे तर डिझेलवर 3.56 रुपये होती ती आज 32 रुपये आहे म्हणजे 820 टक्के वाढ केली आहे, घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे महिला संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत. केंद्र सरकारने गेल्या सात वर्षात अबकारी कर वाढवून 25 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाची आर्थिक लूट केली जात आहे. ज्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत एकदम न्यूनतम होती तेव्हा देखील केंद्र सरकारने स्वयंपाक गॅसचे दर कमी केले नाहीत, गॅस सिलिंडरची किंमत 525 रु  होती, तेव्हा किमान 160 रु सबसिडी मिळत होती. देशातील कोट्यवधी गरिबांसाठी सबसिडी सोडा असे केंद्र सरकारने आव्हान केले, त्यानंतर गॅस सबसिडी बंद झाली आणि सतत गॅस, इंधन दरवाढ, खाद्यतेल, धान्य, डाळी ई च्या महागाईमूळे गरीबी वाढत आहे. विकासाच्या नावाखाली सरकार सामान्य माणसांची लूट करत आहे. गरिबांचा स्वयंपाक महाग केला आहे.

- ऍड. मनीषा महाजन, महिला कार्यकर्त्या (आकुर्डी)


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ


चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आणणार का ?


पूर्वी दोन दोन वर्षे दरवाढ होत नव्हती. मागील दोन वर्षात सरासरी 260 रु दरवाढ झालीय. खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तू पेट्रोल सर्व वाढत आहे. सरकार स्वतःचे उत्पन्न करवाढ करून वाढवत आहे. गरीब कुटुंबांनी काय करावं. उत्पन्न, वेतन गेल्या तीन वर्षात वाढलेले नाही. घरगुती गॅस सबसिडी पुन्हा सुरू करून ती 60 टक्के द्यावी. शहरात घरेलू कामगार, रिक्षाचालक, नाका मजूर इ डेली वेजेस कुटुंबाना चुलीवर स्वयंपाक करायची वेळ येणार आहे.

- सोनाली मन्हास (गृहिणी, तळवडे)


महागाईचा भडका ! पेट्रोल-डिझेलनंतर आता 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार !


ते जुने दिवस बरे होते दोन दोन वर्षे गॅस दरवाढ होत नव्हती.


सात वर्षात सरकारने महागाई वाढवली आहे, दररोज काम करून आम्ही कुटुंब चालवतो. आम्हाला महिन्याला दोन सिलिंडर लागतात. मला आठवतंय 2014 साली नवं सरकार आले तेव्हा 410 रु गॅस सिलिंडर होता. आमची एकत्र कमाई वाढलेली नाही. आज 945 रु गॅस दरवाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून खाद्यतेल, पेट्रोल, अन्नधान्य, विजेची बिले शिक्षण खर्चाने रोजंदारी लोक भरडून गेलेत, तिप्पट दरवाढ ही आमची लूट आहे. आमचे केरोसिन सुरू करा.

- योगिता कांबळे (घरेलू कामगार, पिंपळे गुरव)


महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, ४ श्रमसंहितेच्या विरोधात ५० हजार कामगार रखरखत्या उन्हात रस्त्यावर !


सरकारने महसूल वसुलीसाठी दरवाढ करू नये.


घरगुती, खानावळ, पोळीभाजी, व्हेज नॉनव्हेज स्नॅक्स इ व्यवसायात आता दरवाढ करता येत नाही. खाद्यतेल, डाळी, कडधान्ये इ सर्व वस्तूंची दरवाढ सलग चार वर्षे होत आहे, आता टिफिन थाळी, लाडू, चिवडा, स्नॅक्स इ. चे दर वाढवता येते नाही. व्यापारी आणि घरगुती दोन्ही गॅसची दरवाढ आवाक्याबाहेर आहे, सरकारने महसूल वसूल करण्यासाठी दरवाढ करू नये, सरकारने गरीब आणि मध्यमवर्गाची दुःखे समजून घ्यावीत.

- गौरी साकुरे (गौरी किचन सर्व्हिसेस, आकुर्डी)-क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा