Breaking

दारुबंदीचे तीन तेरा, विषारी दारू मुळे 13 मृत्यूमुखी जणांचा मृत्यू


बिहार : बिहारमध्ये होळीच्या दिवशी शहरात छुप्या पद्धतीने विकली जाणारी बनावट दारू प्राशन केल्यामुळे राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये 13 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी 10 मृत्यू बांका जिल्ह्यात झाले आहेत. तर अनेक जण विषारी दारू पिऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. नालंदामध्ये 9 जणांचा मृत्यू, तर उर्वरित भागलपूर मधील आहेत.


दारू पिऊन तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची तक्रार मृतांचे नातेवाईक करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. एसएचओ सुरेश प्रसाद यांच्यानंतर सदरचे डीएसपी डॉ. शिबली नोमानी घटनास्थळी पोहोचून कुटुंबीयांकडून माहिती घेत आहेत.


बिहारच्या अनेक जिल्ह्यात हातभट्टी सदृश्य दारू गाळली जाते. बनावट दारू स्वस्त असते, त्यामुळे मजूर बाटल्या भरून घरी नेऊन प्राशन करतात. होळीच्या सणाचे दिवशी सर्वात जास्त बनावट दारू बिहार मधील अनेक जिल्ह्यात विकली जाते. मधेपुरा, भागलपूर, बांका, दिघी पंचायतीच्या मुरलीगंजमधील  परिसरात होळीच्या वेळी अनेकांनी दारूचे सेवन केले होते. दारू प्यायल्यानंतर लोकांना हळूहळू उलट्या, जुलाब आणि मळमळ, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या सर्व अस्वस्थ लोकांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा