Breaking

व्हिडिओ : हायस्पीड रेल्वे समोर मुलाने घेतली उडी, जीवाची पर्वा न करता पोलिसांने वाचवला जीव


मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या एका हवालदाराचा धाडसी व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे स्थानकावर पोहोचण्याच्या काही सेकंद आधी कॉन्स्टेबलने धाडसाने 18 वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले. एका 18 वर्षीय मुलाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.


व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला मुलगा ट्रेन येण्याची वाट पाहत स्टेशनवर उभा आहे. तर दुसरीकडे पोलीस हवालदारही त्याच्या शेजारी पुढे जाताना दिसत आहेत. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच मुलगा रुळावर उडी मारतो. काही पावले दूर उभ्या असलेल्या हवालदाराला ट्रेनच्या वेगाचा आणि अंतराचा अंदाज येतो आणि तोही रुळावर उडी मारतो. कॉन्स्टेबलने वेळीच मुलाला सुखरूप वाचवतो.


कॉन्स्टेबलचा धाडसी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पो.ना. ऋषिकेश माने यांनी कार्यतत्परतेने आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण वाचविले. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, "पो.ना. ऋषिकेश माने यांनी कार्यतत्परतेने आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण वाचविले. फक्त प्राण वाचवून ते थांबले नाही तर त्या मुलाच्या पालकांना बोलावून त्याचे समुपदेशन केले. ऋषिकेश यांच्या धाडसाचं कौतुक वाटतं! आपल्या मुलांसोबत सातत्याने संवाद साधा, अशी सर्व पालकांना नम्र विनंती!".कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा