Breaking

व्हीडिओ व्हायरल : इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बाबा रामदेव संतापले


मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या पासून सतत इंधनाचे दर वाढत आहेत. इंधन दरवाढीची शक्यता देखील अगोदर पासून वर्तवली जात होती. या इंधन दरवाढीवरून योगगुरू बाबा रामदेव यांना एका पत्रकाराने जुन्या विधानांची आठवण करून देत तिखट प्रश्न विचारायला, यानंतर बाबा रामदेव पत्रकारावर संतापल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.


बाबा रामदेव यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जनतेला विचारले होते की, तुम्हाला 40 रुपये प्रतिलीटर पेट्रोल आणि 300 रुपये सिलिंडरवालं सरकार हवंय ना ? पत्रकारांनी बाबा रामदेव यांना याच विधानाची आठवण करून देत महागाईवरून प्रश्न विचारले. या प्रश्नामुळे रामदेव संतापल्याचं पाहायला मिळालं. रामदेव म्हणाले, "हो, मी बोललो होतो, तुम्ही काय करू करणार? असे प्रश्न विचारू नका. तुम्ही काहीही विचाराल आणि मी त्यावर उत्तर द्यायला मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारा ठेकेदार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढ थांबेना, सलग नवव्यांदा वाढपत्रकाराने बाबा रामदेव यांच्या जुन्या विधानाची आठवण करून देताना, तुम्ही सर्व टीव्ही चॅनेल्सवर असे बाइट्स दिले होते ना ? यावर बाबा भडकून पत्रकाराला म्हणाले की 'दिला होता, आता देणार नाही. काय करशील, जे करायचं ते कर. आता गप्प बस, पुढे काही विचारलंस तर याद राख. अशी धमकी देखील दिली.


व्हिडिओ व्हायरल : इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बाबा रामदेव संतापले


छत्रपती शिवाजी महाराजांनी जात जाणिव वजा करून स्वराज्यातील सैन्य उभे केले - डॉ. श्रीपाल सबनीस


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा