Breaking

खऱ्या व्यावसायिकांना गाळे मिळेपर्यंत संघर्ष करू : बाबा कांबळे


हॉकर्स झोन निर्मितीसाठी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे संपर्क अभियान सुरू


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेने गाळे वाटप सुरू केले आहे खरे. मात्र त्याचा लाभ चुकीच्या व्यक्तींना होत आहे. खऱ्या व्यावसायिकांना गाळे मिळत नाहीत. त्यामुळे खऱ्या व्यावसायिकांना गाळे मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते  बाबा कांबळे यांनी सांगितले. तसेच आयुक्त राजेश पाटील यांना भेटून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही बाबा कांबळे म्हणाले.

टपरी, पथारी हातगाडी पंचायत वतीने जनसंपर्क अभियान अंतर्गत कृष्णानगर तेथे सभेचे आयोजन केले होते. या वेळी  बाबा कांबळे बोलत होते. 


या वेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, उपाध्यक्ष प्रकाश यशवंते, कृष्णानगर कस्तुरी मार्केट भाजी मंडई अध्यक्ष छाया खुरंगळे, उपाध्यक्षा कविता थोरात, पूजा कांबळे, सुशीला अण्णा जोगदंड, इस्माईल बागवान, अमोल गायकवाड अमोल धूमाळ, फिरोज  बागवान, आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, महापालिका प्रशासनाने गाळे वाटप करताना पारदर्शीपणा जोपासणे गरजेचे आहे. गाळे वाटप करताना गरजू बाजूला राहतात व इतरांनाच त्याचा लाभ होतो. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत सविस्तर माहिती देऊ. मात्र देखील योग्य कार्यवाही न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करून गाळे वाटप थांबवू, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
गाळे दिले मात्र सुविधा नाही : बाबा कांबळे

सध्या फ क्षेत्रीय कार्यालयांर्गत गाळे वाटप करण्यात येणार आहे. मात्र ज्या गाळ्यांचे वाटप होणार आहे तिथे कोणतीही सुविधा दिलेली नाही. सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्याचा नाहक त्रास व्यावसायिक आणि ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे गाळे वाटप करताना सुविधा देखील द्याव्यात असे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले. अण्णा जोगदंड यांनी प्रस्तावना केली अविनाश जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले, समधन गवळी, यांनी आभार मानले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे लक्ष्मण शेलार, बाळासाहेब ढवळे, कष्टकरी जनता आघाडी दीपक महाराज, स्मिता देशपांडे, मंगल गवळी यांनी पाठिंबा दिला.

- क्रांतिकुमार कडुलकर
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा