Breaking


चिंचवड येथे 31 वी श्रमउद्योग परिषदेचे आयोजन


पिंपरी चिंचवड : औद्योगिक विकास परिषद, महाराष्ट्र राज्य क्लब भोजापूर गोल्ड आणि दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ३१ व्या श्रम-उद्योग परिषदेचे चिंचवड येथे आयोजन केले आहे.


शुक्रवारी (दि.29) सकाळी साडेदहा वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात परिषदेचे उद्‍घाटन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होईल. टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पराळकर अध्यक्षस्थानी असतील. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांना श्रमभूषण, उद्योजक सखाराम रेडेकर यांना उद्योगभूषण,किशोर हिंगे यांना उद्योगमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


खडकीतील किर्लोस्कर ऑइल, चिंचवडची एसकेएफ बेअरिंग, कोथरूडची कमिन्स इंडिया या उद्योगांना सुरक्षितता पुरस्कार प्रदान केला जाईल. उपेक्षित कष्टकऱ्यांचाही गौरव केला जाणार असल्याचे परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी सांगितले.


- क्रांतिकुमार कडुलकर


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तहसिलदरांमार्फत पंतप्रधानांना निवेदन


कृषी मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 50,000 रूपये पगाराची नोकरी


कृषी पुरस्कारांनी १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा