Breaking

अ‍ॅॅट्रॉसिटी दाखल असलेल्यांना अटक करण्यासाठी आंदोलन, आदिवासी संघटना एकवटल्या


पुणे : उधारी पैसे दिले नाहीत म्हणुन आदिवासी समाजातील व्याक्तीला  जातीवाचक शिवीगाळ, करून गावात दहशत निर्माण करणाऱ्यास तत्काळ अटकवांद्रे करावी, अशी मागणी वांद्रे (खेड) ग्रामस्थ, ट्रायबल फोरम, बिरसा ब्रिगेड यांनी करूनही पोलिस अधिकारी आणि पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ वांद्रे येथील अन्यायग्रस्त व्यक्ती सह  कार्यकर्त्यांनी राजगुरू नगर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या बुधवारी दि.३० रोजी बेमुदत उपोषण सुरू केले.


सविस्तर वृत्त असे की, पढरवाडी (वांद्रे, ता. खेड) येथे ग्रामस्थ सुरेश गबाजी पढर व तुकाराम खंडू पढर हे  दिनांक ५ मार्च २०२२ दुपारी रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी जात होते. यावेळी वाटेत गावातच राहणाऱ्या धनंजय चिंधू सावंत यांनी त्यांना अडवले. धनंजय याने पढर यांच्या कडे जनावरांच्या अंबवणाचे दुकानाचे उधरीचे पैसे मागून जतीवच बोलून तुमची लायकीसुध्दा नाही असे म्हणून शिवीगाळ केली. त्याच दिवसी सुरेश गबाजी पढर यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी धनंजय सावंत यांच्या अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमान्वये  गुन्हा दाखल केला होता. 


आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्र वृत्ती देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, आंदोलनाचा ६ वा दिवस
मात्र, त्याला पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केली नाही सुरेश पढर व तुकाराम पढर यांच्या कुटुंबीयांना त्यांच्यापासून धोका असल्याने त्यांनी आदिवासी संघटनांची मदत घेतली. तालुक्यातील बिरसा ब्रिगेड व ट्रायबल फोरम याबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठपुराव केला; मात्र अद्याप संजय सावंत व त्यांच्या साथीदाराला अटक झाली नसल्याचे आजपासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजगुरुनगर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. 


या उपोषणात पीडीत कुटुंबातील व्यक्तीसह ट्रायबल फोरम, बिरसा ब्रिगेड, बिरसा क्रांती दलाचे एकनाथ तळपे, अमृता आंनबवने, सूरज धादवड, तान्हाजी भोकटे, ज्ञानेश्वर निधन, देवा सुरकुले, शशिकांत आभारी, दिलीप बांगर, कैलास निधन, सोपान मेठ्ठल, रोहिदास मेठ्ठल व ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.


आरोग्य सल्ला : रणरणत्या उन्हात अशी घ्या त्वचेची काळजी !


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका सुरूच, सलग दहाव्यांदा वाढ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा