Breaking

अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यांना ग्रॅच्युईटी चा लाभ देण्याचे निर्देश, सिटू संघटनेच्या प्रयत्नांना यश - डॉ.डि.एल. कराड


नाशिक : एकात्मिक महिला व बालविकास विभागा अंतर्गत अंगणवाडी केंद्रांमध्ये कामासाठी नियुक्ती करण्यात आलेले अंगणवाडी कर्मचारी (Anganwadi staff) व मदतनीस (helpers) हे 'पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अ‍ॅक्ट, १९७२' अन्वये उपदान (ग्रॅच्युइटी) मिळण्यास पात्र आहेत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. या निर्णयाचे स्वागत सिटूचे (CITU) राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड (Dr. D. L. Karad) यांनी केले आहे.


डॉ. कराड म्हणाले, सिटू प्रणितअंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांच्या फेडरेशनच्या प्रयत्नामुळे सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यांना ग्रॅच्युईटी चा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस फेडरेशन कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी चा लाभ द्यावा या मागणीसाठी सतत प्रयत्नशील आहे व आंदोलन करत आहे. प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर व न्यायालयीन लढाईमुळे ग्रेच्युटी चा हक्क सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.


देशातील व राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी मदतनीस, सर्व पदाधिकारी व लढाऊ कार्यकर्त्यांचे अभिनंदन. कामगार चळवळीचा इतिहास पाहता कामगार वर्गाला मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सिटूने त्या त्या क्षेत्रातील कामगारांची एकजुट करून प्रदीर्घ लढे दिले आहेत. प्रखर संघर्ष केला आहे. न्यायालयाचाही मार्ग अवलंबला आहे.

अशा सर्व प्रकारच्या प्रयत्नांमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी चा लाभ मिळणार आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे. नवउदारवादी खाजगीकरण च्या धोरणामुळे कामगार वर्गाचा एकेक हक्क हिरावून घेत जात असताना आपण हा हक्क लढून मिळवलाय  याचा आपणा सर्वांना अभिमान आहे.


येत्या काळामध्ये अंगणवाडी इतर सर्व क्षेत्रातील कामगारांना ग्रॅच्युईटी, पेन्शन, प्राव्हिडंट फंड, आरोग्य विमा हे सामाजिक सुरक्षा लाभ मिळाला लागू झाले पाहिजेत यासाठी चा लढा तीव्र केला जाईल, असे सिटूचे राज्य सरचिटणीस एम‌.एच.शेख म्हणाले.

तर सिटूचे खजिनदार के. आर. रघु म्हणाले, "सिटूच्या सर्व संघटना मजबूत केल्यानंतरच आपण सरकारला धोरण बदलायला भाग पाडू शकतो. त्यासाठी सामान्य सभासदा पासून सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील काळातही जोमाने आपल्या संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी."


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा