Breaking

पिंपरी चिंचवड मनपावर "एप्रिल फूल" आंदोलन, केल्या ‘या’ मागण्या


पिंपरी : पथारी, हातगाडीधारकांचा प्रश्न असो, पाणी प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो प्रशासनाकडून वर्षभर श्रमिकांना व गोरगरिबांची थट्टा करत मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका काशिनाथ नखाते यांनी आज शुक्रवारी पिंपरी चिंचवड मनपाच्या फ प्रभागावर *एप्रिल फुल" आंदोलन दरम्यान केली.


प्रशासन शहरातील नागरिकांसोबत विदूषकाच्या भूमिकेतून वागत असून आमच्या मागण्याबाबतीत थट्टा थांबवा व पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करा. फेरीवाल्यांना जागा निश्चि तीसाठी विश्वासात घ्या. बोगस विक्रेत्यांना वाटप रद्द करा अशा मागण्या करण्यात आल्या.


यावेळी पिंपरी-चिंचवड मनपाच्या फ प्रभाग कडून कृष्णानगर भाजी मंडई येथे बोगस पद्धतीने नावे नोंद करून त्यांना गाळे देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत, ती रद्द करुन कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच, ही अन्यायकारक कारवाई थांबवावी, अर्बन स्ट्रीटमध्ये पथ विक्रेत्यांचा  समावेश करावा, तसेच २००८ ते २०१४ पर्यंत सर्वेक्षण झाले आहे, अशा पावती असलेले विक्रेत्यावर कारवाई करू नये आदी मागण्यांचे निवेदन क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने त्यांचेशी चर्चा केली.


कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनात झालेल्या आंदोलनामध्ये कार्याध्यक्ष राजू बिराजदार, मनपा सदस्य राजेंद्र वाघचौरे, फ अध्यक्ष मधुकर वाघ, इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर, राजेश माने, सलीम डांगे, बालाजी लोखंडे, वृषाली पाटणे, बाळासाहेब सातपुते, भारत इंगळे, आसिफ शेख, शिवानंद स्वामी, भारत गायकवाड, ईश्वर ठोंबरे, बाळासाहेब शेगडे, शंकर पवार, सागर ठोंबरे, विजया चोरमले, लक्ष्मी नागरगोजे, नितीन काकडे, अंबालाल सुकलाल, पप्पू तेली, रामा बिरादार, सूशेन खरात, इस्माईल शेख आदी उपस्थित होते.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्बनस्ट्रीटच्या नावाखाली मोठमोठे पदपथ निर्माण करून रंगीत पेविंग ब्लॉक टाकुन तयार केलेले स्ट्रीट यामुळे मूळ रस्त्यावरती ताण येत असून ते रस्ते छोटे आणि पद मोठी असा प्रकार झालेला आहे, आणी त्यात जशी  कार पार्किंग आहे, या पथावर पथ  विक्रेत्यांनाही सामाउन संधी देणे गरजेचे आहे, मात्र मनपा याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. आरोग्य प्रश्न, पाणीप्रश्न, स्वच्छता आणि फेरीवाला प्रश्नाच्या बाबतीत कायम दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा