Breaking

आशा व गटप्रवर्तक एकजूटीच्या पाठपुरावाला यश, राज्य सरकारचे जुलै 2021 चे मानधन मार्चपर्यंत मिळणार !


सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभर 68 हजार आशा व 4 हजार गट प्रवर्तक कार्यरत आहेत. कोरोना काळात जीवावर उधार होऊन काम केले आहे. 2007 पासून कार्यरत आशा ना फक्त कामाप्रमाणे मोबदला अगदी तुटपुंजा मिळत होता. महाराष्ट्र शासन काहीही मोबदला देत नव्हते. यामुळे सिटू संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटना सातत्याने आंदोलन करत होत्या. 2019 - 2020 मध्ये कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर संप केल्यानंतर 2020 जुलै पासून आशा ना दरमहा 2 हजार रुपये व गट प्रवर्तकांना 3 हजार रुपये मानधन राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला. 


तसेच 2021 मध्ये प्रचंड कठीण काळात कोरोना असताना 2021 मध्ये पुन्हा तीव्र संघर्ष आशांनी केला. संप जून 2021 मध्ये केल्यावर आशा च्या मानधन मध्ये दरमहा 1 हजार रुपये व गट प्रवर्तक ना 1200 रुपये मानधन वाढ, व 500 रुपये दरमहा कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महाराष्ट्र  शासनाने घेतला. मात्र अंमलबजावणी आर्थिक तरतूद झालेली नव्हती. दि 30 मार्च 2022 रोजी आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी पत्राद्वारे वरील दोन्ही निर्णय मानधन वाढ संदर्भात अंमलबजावणी होणार आहे. वरील निर्णय अंमलबजावणी व्हावी, असे जाहीर केले आहे.


तसेच 2016 पासून आशा व गट प्रवर्तक चे मानधन मध्ये केंद्र सरकारने मानधन वाढ केली नाही. गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ताच मिळतो या विरोधात देशभर 28, 29 मार्च 2022 रोजी देशभरात 7 लाख आशा व 80 हजार गट प्रवर्तक आंदोलन केले होते.   

राज्य सरकारने केलेली मानधन वाढ रक्कम दरमहा मिळावी, आशा व गटप्रवर्तक ना किमान वेतन मिळावे यासाठी सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने लढत असून आंदोलनात सक्रिय सहभाग असतो, असे आशा व गटप्रवर्तक फेडरेशन घ्या राज्य अध्यक्षा आनंदी अवघडे म्हणाल्या‌.


येणाऱ्या काळात देखील आशा व गटप्रवर्तकांच्या यात मागण्यांसाठी लढा तीव्र करण्यात येणार असून आशा व गटप्रवर्तक ना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य शासनाने संप काळात केलेल्या चर्चा व निर्णय ची अंमलबजावणी करावी, अन्यथा पुन्हा आशा व गटप्रवर्तकांच्या रोषाला सामोरे जावे, असा इशाराही अवघडे यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा