Breaking

चिखली प्राधिकरण पेठ क्र.16 मध्ये पहाटे पासून बत्ती गुल


पिंपरी चिंचवड : चिखली प्राधिकरण पेठ क्र. 16 राजे शिवाजीनगर मध्ये नागरिक महावितणच्या कारभाराला वैतागून गेले आहेत. आज रविवारी पहाटे 5 वा बत्ती गुल झाली होती. या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो.


आज सुटीचा दिवस आहे. वीजपुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांना  फॅन, कुलर बंद पडल्यामुळे मनस्ताप झाला आहे. पाणी उपसा मोटारी बंद पडल्यामुळे सोसायटीच्या वरच्या टाक्या रिकाम्या राहिल्या.


मोशी येथील महावितरणच्या उपकेंद्रात आणि अन्य ग्राहक सेवा नंबरवर प्रयत्न करूनही संपर्क होत नव्हता. वाय फाय, इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे ऑनलाइन काम करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर माहितीचा संदेश पण भ्रमण ध्वनी वर येत नाही. या परिसरात सतत बिघाड होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होतो.

येथील देखभाल, दुरुस्ती व्यवस्थापन आणि ग्राहक सेवा कुचकामी आहे. व्यावसायिक आणि ग्राहक स्नेही वितरण आणि तक्रार निवारण अधिकारी मोशी महावीतरण कार्यालयात नेमले तर लाईट का गेली याची उत्तरे तरी मिळतील, त्यामुळे सावळा गोंधळ थांबेल, असे येथील रहिवासी क्रांतिकुमार कडुलकर यांनी म्हटले आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा