Breaking

ब्रेकींग : स्वयंपाकाच्या गॅस (LPG) दरात प्रचंड वाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर गॅस दरवाढीचा भडका


नवी दिल्ली : महागाईने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढताना दिसत आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस एलपीजीच्या दरात प्रचंड वाढ करण्यात आली आहे.


सविस्तर वृत्त असे की, 19 किलो व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 250 रुपयांनी वाढ झाली आहे. आता त्याची किंमत आजपासून 2253 रुपये होणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये वाढ झाल्यामुळे महागाई वाढणार आहे. खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. कारण, अवघ्या 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा