Breaking


ब्रेकिंग : रेल्वे अपघात, नाशिक येथे पवन एक्स्प्रेसचे डबे रूळावर घसरले


नाशिक : नाशिकजवळील लहवित आणि देवळाली रेल्वे स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) - जयनगर पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरल्याने एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.


ही घटना रविवारी दुपारी 3.10 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेचा मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असूनही दुसरीकडे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे व्यवस्थापन, अग्निशमन आणि वैद्यकिय पथके घटनास्थळी कार्यरत झाली आहेत.

रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी यासाठी 0253-2465816 (नाशिक) हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तर मुंबईतील सीएसएमटीच्या टीसी ऑफीसकडूनही MTNL: 02222694040 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा