Breaking

चैत्र पालवीचा सण - शहरात उत्साहात गुढी पाडवा

निसर्गाचे सांस्कृतिक वैभव टिकवू या - प्रा. डॉ. वंदना पिंपळे आणि विठ्ठल पिंपळे 

जल, जंगल, जामीन वाचवू - गृहिणींनी निसर्ग पूजा केली


पिंपरी चिंचवड : साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढी पाडवा शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. इंधन, खाद्यतेल जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी बरोबर प्रचंड तापमान वाढ शहरात जाणवत आहे. मागील दशकात 35 डिग्री च्या आसपास असणारे तापमान 41 डिग्री झाले आहे. इतिहासातील सांस्कृतिक, कृषी संस्कृतीची गुढी विविध गृहसंकुलातील गॅलरीत उभारण्यात आली. यावेळी महिलांनी पर्यावरण, जल, जंगल जमीन वाचवली पाहिजे, अश्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

निसर्गाचे सांस्कृतिक वैभव टिकवू या - प्रा. डॉ. वंदना पिंपळे आणि ॲड. विठ्ठल पिंपळे 

गुढी पाडव्याच्या दोन महिने आधी निसर्गात बदल होतात,झाडांची जुनी पाने गळून पडतात. आणि नवीन पालवी फुटते. चैत्रपालवी आणि वसंत ऋतू मनातील नवी स्वप्ने साकारत असतो. जुने दिवस जाऊन नवी स्वप्ने साकारणाऱ्या निसर्ग पर्वाची सुरवात होते. निसर्गाचे सांकृतिक वैभव म्हणजे जल, जंगल, जमीन आहे, उपभोगवादी स्वभाव बदलून निसर्ग पर्यावरण रक्षण करू या. असे मत चिंचवड गाव येथील वाल्हेकरवाडीच्या प्रा. डॉ. वंदना पिंपळे व ॲड. विठ्ठल पिंपळे यांनी व्यक्त केले.


पर्यावरणाच्या रक्षणासाठी गुढी - संजीवनी मुसूडगे आणि रमेश मुसूडगे

पर्यावरणाच्या रक्षणासाठी गुढी - संजीवनी मुसूडगे आणि रमेश मुसूडगे

सर्जनशील निसर्गाच्या रंग, रूप , गंध, नाद स्पर्शातील शालीनता म्हणजे वसंताच्या आगमनाची चाहूल. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्वउत्पत्तीच्या आदिम क्षणांचा तो साक्षीदार आहे. भूतलावर जल, जंगल, जमीन हे सृष्टीचे वैभव आहे. ते पर्यावरण  जपण्यासाठी समृद्धीची गुढी उभी करूया, असे आवाहन थेरगाव येथील वाकडच्या संजीवनी मुसूडगे आणि रमेश मुसूडगे यांनी केले.


प्रत्येकाने एक तरी झाड मोठे करावे - शैलजा कडुलकर आणि मुक्त पत्रकार क्रांतिकुमार कडुलकर

प्रत्येकाने एक तरी झाड मोठे करावे - शैलजा कडुलकर आणि मुक्त पत्रकार क्रांतिकुमार कडुलकर

प्रत्येकाला माहीत पाहिजे आपण गुढी का उभारतो. हा दिवस पर्यावरण व निर्सगाशीही जोडला गेला आहे. गुढी उभारतांना आपण कायम त्या गुढीवर कडुलिंब व आंब्याच्या पानांचं तोरण लावतो. त्यानंतर ही पानं खाल्लीदेखील जातात. परंतु हे तोरण का लावण्यात येतं किंवा ही पानं का खावीत हे फार कमी जणांना माहित आहे. वसंत ऋतू सुरु झाला की उन्हाच्या झळा बसू लागतात. परिणामी, या काळात उष्णतेचे विकारही सुरु होतात. हे उष्णतेचे विकार होऊ नये वा उन्हाळा बाधू नये यासाठी कडुलिंबाची पानं खाल्ली जातात. त्यामुळे सिमेंटच्या शहरी जंगलात आता झाडे लावून वाढवली पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड मोठे करावे असे आवाहन शैलजा कडुलकर आणि मुक्त पत्रकार क्रांतिकुमार कडुलकर यांनी केले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा