Breaking

श्रीलंकेत महागाईचा हाहाकार ; नागरिकांची हिंसक आंदोलने, 45 जणांना पोलिसांनी केले अटक

Photo : @Reuters

श्रीलंका : गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. देश स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक परिस्थितीतून सध्या जात आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले असून श्रीलंकेच्या करन्सीची व्हॅल्यू ही डॉलरच्या तुलनेत आता जवळपास अर्धी झाली आहे.


देशातील पेट्रोल पंपांवर डिझेल संपले आहे. पेट्रोलचा पुरवठाही खूपच कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. देशात 13 तास वीजपुरवठा खंडित आहे. विजेची बचत करण्यासाठी पथदिवे बंद करण्याची सरकारची योजना आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देण्यासाठी देशात कोणतेही परकीय चलन शिल्लक नाही. त्यामुळे देशातील २.२ कोटी जनतेचे जगणे कठीण झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये अराजकता पसरली असून लोक रस्त्यावर निदर्शनांसाठी उतरले आहेत.


महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती


श्रीलंकेतील या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. हिंसेनंतर राजधानी कोलंबोतील अनेक भागात लागू करण्यात आलेला रात्रभर कर्फ्यू शुक्रवारी पहाटे 5 वाजता उठवण्यात आला. हिंसक आंदेलनात भाग घेतल्या प्रकरणी 45 जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. 


श्रीलंकेत घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा अनेक गोष्टींवर मोठा परिणाम होत आहे. काही शहरी भागांमध्ये गॅसचा तुटवडा असल्याने ब्रेडच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. तर काही बेकऱ्याही बंद पडल्य़ा आहेत. जीवनावश्यक वस्तू, औषधं, इंधन यांसह भाज्याच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाज्या देखील खरेदी करू शकत नाहीत.


हसन मुश्रीफ यांना आयकर विभाग ताब्यात घेणार ? किरीट सोमय्यांचं ट्विट


श्रीलंका सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. एक कप चहासाठी १०० रुपये द्यावे लागत आहेत. तर ब्रेड, दूध यासारख्या पदार्थांसाठी देखील मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ब्रेडचं एक पॅकेट १५० रुपयांना तर एक किलो दूध पावडर १९७५, एलपीजी सिलिंडर ४११९, पेट्रोल २५४ तर डिझेल १७६ रुपये प्रति लीटर आहे. ही महागाई अशीच राहिली तर उद्या कुटुंबाला काय खायला घालणार त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटिव्हीने दिले आहे.


ब्रेकींग : स्वयंपाकाच्या गॅस (LPG) दरात प्रचंड वाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर गॅस दरवाढीचा भडका


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा