Breaking

पुना केरळा जमातुल मुस्लिमिन तर्फे रमजान कीट चे वाटप


पिंपरी चिंचवड : सालाबाद प्रमाणे पुना केरळा जमातुल मुस्लिमिन तर्फे दि.२८ एप्रिल २०२२ रोजी श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे रमजान कीट चे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. हे या संघटनेचे माजी अध्यक्ष मरहूम ए.के.जाफर यांच्या संकल्पनेतून २० वर्षा पुर्वी सुरू करण्यात आले होते.


दर वर्षी पिंपरी चिंचवड, पुणे, खिडकी, येरवडा तसेच देऊरोड, शिक्रापुर, पाबळ, यवत या सारख्या ग्रामीण भागात गरीब, अनाथ, अंध व अपंग व्यक्तींना किराणा मालाचे रमजान कीट म्हणून वाटप करण्यात येते. 


या प्रसंगी मल्याळी समाजाचे नेते श्रीकृष्ण मंदिराचे विश्वस्त हरिदास नायर, शशीधरन, के. हरीनारायणन, शिवसेना पिंपरी चिंचवड अल्पसंख्याक अध्यक्ष दस्तगीर मणियार, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष युसूफभाई कुरेशी, शहाजी आत्तार, फैज दलाल,आर पी आय वाहतुक आघाडी अध्यक्ष अजिज शेख,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष इम्रान शेख आणि युवक पदाधिकारी, काँग्रेस नेते सजी वर्की, दै.मातृभूमी चे पत्रकार रवी नायर, फरिद सय्यद, मुबिन मणियार, सामाजिक कार्यकर्त्या रूहीनाज शेख, फेहमिदा शेख उपस्थित होते.  

या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दूरध्वनी द्वारे पुना केरळा जमातुल मुस्लिमिन च्या कार्यास संघटनेस व येणा-या रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व अजिज शेख यांच्या मार्फत शुभेच्छा पत्र पाठवण्यात आले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुना केरळा जमातुल मुस्लिमिन चे कार्याध्यक्ष ए. के. मन्सूर, सरचिटणीस व्ही. एम. कबीर, खजिनदार ॲड. अब्दुल करीम, साहूल हमीद बाबू, महिला अध्यक्षा हाजरा कबीर, इकबाल कॅसिनो, मोईन पुना, अशरफ टुरिस्ट, सागरभाई, जलील बाबू आणि सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतले.

- क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा