Breaking

ब्रेकिंग : बॉलिवूडच्या "या" प्रसिद्ध अभिनेत्रीवर ईडीची मोठी कारवाई, ७ कोटी २७ लाखांची मालमत्ता जप्‍त


नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मोठ्या अडचणीत सापडली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिची सात कोटी २७ लाख रुपयांची मालमत्ता जप्‍त केली आहे.


काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणातील सुकेश चंद्रशेखर यांच्याशी जोडलं गेल्यानंतर जॅकलिन आयकर विभागाच्या रडारवर होती. त्यावेळी आयकर विभागाने जॅकलिनची कसून चौकशी केली. आता आयकर विभागानं जॅकलिनवर कारवाई करत तब्बल ७.२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मनी लँड्रिंगच्या प्रकरणात फसलेल्या जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात आयकर विभागानं केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.


मेगा भरती : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 862 जागांसाठी भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !

मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला ५.७१ कोटी रुपयांच्‍या भेटवस्‍तु दिल्‍या होत्‍या. तसेच सुकेशने जॅकलिनच्‍या नातेवाईकांनाही महागड्या भेटवस्‍तू दिल्‍या होत्‍या. यामध्‍ये अलिशान कार, महागड्या वस्‍तू यांचा समावेश आहे. आता जॅकलिनची संपतीच जप्‍त केल्‍यामुळे तिच्‍या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.


लखनऊ सुपरजायंट्सच्या "या" सदस्याचा कार अपघात


सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती, 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची संधी


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा