Breaking

अखेर परवानगी नाकारलेला तो नास्तिक मेळावा पडला पारपुणे : काही दिवसांपुर्वी १० एप्रिलला होणाऱ्या नास्तिक मेळाव्याच्या विरोधात काही धार्मिक गटातील लोकांनी पोलिसांची भेट घेत या कार्यक्रमावर हरकत घेतली होती, त्यानंतर पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारलेला हा सातवा नास्तिक मेळावा आज पुण्यात संपन्न झाला.


भगतसिंग विचार मंचच्या वतीने पुण्यात सातव्या नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मानवाधिकार कार्यकर्ते अॅसड. असीम सरोदे, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर, तुकाराम सोनवणे हे मान्यवरही उपस्थित होते. तर य. ना. वालावलकर अध्यक्षस्थानी होते.


यावेळी अॅमड. असीम सरोदे यांनी देव-धर्म न मानण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, असा निर्णय मुंबई उच न्यायालयाने दिला असल्याचे सांगताना सध्याच्या हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून हल्लाबोल केलाय. हनुमान चालिसा म्हणायची असेल तर स्वतःच्या घरात म्हणा. दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा दुराग्रह का? असा सवाल असीम सरोदे यांनी विचारला. तसेच दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नसून राजकारण आहे, असं मत व्यक्त केलं.


वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र माणूस खरा साहिष्णुभाव जपू शकतो. “चिकित्सा आणि प्रश्न विचारण्याची ताकद फक्त नास्तिकतेतून येते. धर्मासाठी ‘गर्व से कहो’ म्हणणार असाल तर मी तुम्हाला विरोध करेन ही भूमिका घ्यावी लागेल,” असं मत सुनील सुकथनकर यांनी यावेळी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा