पिंपरी चिंचवड : घरेलू कामगार महिलांच्या अनेक प्रश्न आणि समस्या आहेत या सोडवण्यासाठी महासंघ प्रयत्नशील असून महिलांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्काची लढाई पुढे अविरत चालू ठेऊ असा निश्चय कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयोजित बैठकीत करण्यात आला.
यावेळी महिला अध्यक्षा माधुरी जलमुलवार, मुख्य समन्वयक नम्रता जाधव, अर्चना कांबळे, शशीकला प्रधान, संध्या जाधव, राणी काळे, माया डोंगरे, शितल मोरे, अनिता गायकवाड यांच्यासह घरेलू महिला कामगार उपस्थित होते.
चिंचवड येथे 31 वी श्रमउद्योग परिषदेचे आयोजन
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयोजित बैठकीत सध्याच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दि.२४ रोजी भुमकर चौक येथे घरेलू काम करणार्या महिलेचा राजू कतरी याने विनयभंग केला, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व महिलांनी केली. तसे पत्र लवकरच पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
तसेच यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. महिलांना हीन वागणूक मिळणार नाही याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे असेही मत व्यक्त केले. लवकरच घरेलू कामगारांच्या विमा योजना, सन्मान योजना, त्याचबरोबर घरेलू कामगारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे माधुरी जलमुलवार यांनी नमूद केले. घरेलू कामगारांनी पगार न मिळाल्यास व आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महासंघाचे पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
- क्रांतिकुमार कडुलकर
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तहसिलदरांमार्फत पंतप्रधानांना निवेदन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा