Breaking

अखेर जगातील ‘या’ श्रीमंत व्यक्तीने 44 अब्ज डॉलर्समध्ये केली ट्विटरची खरेदी


नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांपैकी एक असलेल्या ट्विटरची आता विक्री झाली आहे. टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी सुमारे 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतलं आहे. त्यांनी ट्विटर कंपनी $54.20 प्रति शेअर या दराने विकत घेतली आहे.


काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये 9% हिस्सेदारी विकत घेतली होती. आता मस्क यांनी ट्विटर इंकचा 100% हिस्सा विकत घेतला आहे. ट्विटरने याबाबत माहिती दिली की ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अब्जाधीश उद्योजक इलॉन मस्क हे 44 अब्ज डॉलरच्या करारामध्ये विकत आहेत. मस्क यांनी या कराराची घोषणा करताना संयुक्त प्रकाशनात म्हटले की, मोकळ्यापणाने बोलणे हा एक कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे आणि ट्विटर हे डिजिटल टाउन स्क्वेअर आहे जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली जाते.


कंपनीचे नवीन मालक एलॉन मस्क म्हणाले, 'भाषण स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. ट्विटर हे असंच एक डिजिटल टाउन आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते. ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. मला त्यात नवीन वैशिष्ट्ये जोडून ते पूर्वीपेक्षा चांगलं बनवायचं आहे. मी कंपनीसोबत काम करण्यास उत्सुक आहे. ते अनलॉक केल्याबद्दल मी वापरकर्त्यांचे आभार मानतो.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा