Breaking


...अखेर संघटनेच्या लढ्याला यश - आशा व गटप्रवर्तक नेत्या नेत्रदिपा पाटील


कोल्हापूर : आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारचे जुलै 2021 चे मानधन मार्च पर्यंत मिळणार आहे. हे संघटनेच्या लढ्याला यश आले असल्याचे कोल्हापूर आशा व गटप्रवर्तक युनियनच्या अध्यक्षा नेत्रदिपा पाटील यांनी म्हटले आहे.


नेत्रदिपा पाटील म्हणाल्या, कोविड काळात कोविड सेशनसाठी आशा आणि गटप्रवर्तक अविरत काम केल्या आहेत, त्याचा मोबदला मिळावा म्हणून संघटनेने राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर मागणी केली होती त्याला यश मिळाले आणि प्रत्येक सेशन नुसार अनुदान प्राप्त झाले. हे आशा व गटप्रवर्तकांच्या एकीचे आणि संघटनेचे आहे.


तसेच फक्त कोवीड 19 चा भत्ता हा सप्टेंबर 2021 पर्यंत च मंजूर होता, त्याचा ही सततचा जिल्हा व राज्यस्तरीय पाठपुरावा केल्यामुळे प्रत्येक घराच्या सर्व्हे कामासाठी 1000 रुपये आशांना व 500 रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले. तसेच प्रत्येक आरोग्य वर्धीनी अंतर्गत जिथे Cho नाहीत तिथे ही काम केलेला सर्व आशांना ensentive मिळावा असे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले.

तसेच गडहिंग्लज तालुक्यातील आशांना सी.बॅक फॉर्म चे प्रती लाभार्थी 10 रुपये प्रमाणे लाभ देण्यात यावा हे मान्य करण्यात आले. तसेच हर घर dasatak या मोहीम अंतर्गत भत्ता मिळण्यासाठी किचकट फॉर्म भरण्याचा विरोध करून सदरचा फॉर्म रद्द करण्यात आला असल्याचे नेत्रदिपा पाटील यांनी सांगितले.

या लढ्यात सिटू चे भरमा कांबळे, शिवाजी मगदूमष चंद्रकांत यादव यांचे मोलाचं योगदान लाभले, असे कोल्हापूर जिल्हा आशा व गट प्रवर्तक युनियन अध्यक्षा नेत्रदिपा पाटील, सचिव उज्वला पाटील, खजिनदार, संगीता पाटील यांनी म्हटले आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा