Breaking

जाणून घ्या आजच्या सोन्या-चांदीच्या किंमती


मुंबई : गेल्या काही सत्रांपासून सोन्यामध्ये घसरण होत होती. मात्र जागतिक बाजारात वाढ झाल्यामुळे मंगळवारी भारतातील बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ पहायला मिळाली.


गुड रिटर्न्सच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,500 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,910 रुपये आहे. तर मुंबई मध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,450 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,860 रुपये आहे. काही दिवसांपासून सोन्याचे दर 53 हजार 500 च्या वर व्यवहार करत आहेत. तर आज चांदीच्या प्रतिकिलोच्या किंमती या 65 हजार 450 रूपये आहे. गेल्या काही सत्रांमध्ये सोन्यामध्ये घसरण पहायला मिळाली. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने भविष्यात व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्याचा परिणामही सोन्याच्या दरावर दिसून आला.


सोन्याचे हे दर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. त्या त्या ठिकाणी तेथिल स्थानिक किंमती वेगवेगळ्या असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा