Breaking


ते एखादे लेक्चर देतात - शरद पवार यांनी राज ठाकरे यांचा घेतला खरपूस समाचार


कोल्हापूर : पाडवा मेळाव्याच्या दिवशी मुंबई शिवतीर्थावरील आयोजित सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, "राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात आणि मग एखादं व्याख्यान देतात. परत व्याख्यान दिल्यावर ३-४ महिने कुठे जातात माहिती नाही. यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला पवारांनीही आज कोल्हापुरात बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.


तसेच शरद पवार म्हणाले, "राज यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. आधी त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या कारभारावर सडकून टीका केली. आता ते पुन्हा मोदींचं कौतुक करत आहेत. भाजपच्या जवळपास जाणारी भूमिका घेत आहेत. उद्या ते काय करतील, काय म्हणतील, ते मला सांगता येणार नाही.


उत्तरप्रदेशातील कितीतरी वाईट गोष्टी सांगता येतील, ज्या योगींच्या राजवटीच्या काळात उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत. उत्तर प्रदेशचं कौतुक करायला त्यांना काय दिसलं मला माहीत नाही. उत्तर प्रदेशात  लखीमपूरला शेतकऱ्याची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकरी वर्षवर भर बसले होते. त्यांची सोडवणूक केलं नाही. कितीतरी गोष्टी सांगता येतील त्या उत्तर प्रदेशात घडल्या. योगींच्या राजवटीत, अशा प्रकारची राजवट उत्तम आहे असं राज ठाकरे यांना वाटत असेल, तर मला त्यावर भाष्य करायचं नाही, असे शरद पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "पण महाराष्ट्रात असं कधी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात होऊ देणार नाही." एकंदर पवारांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांच्या बाजूने किल्ला लढवत राज ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा