Breaking


राज्यात उष्णतेच्या लाटेसह ‘हे’ दुहेरी संकटमुंबई : राज्यात लोडशेडिंगमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना महाराष्ट्रातील काही भागात तापमानात कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. येत्या पाच दिवसांत राज्यावर उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचे दुहेरी संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे.


येत्या 5 दिवसात राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच 2, 3 दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 


सध्या राज्यात पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असता तरी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका हा द्राक्ष व आंब्यांच्या बागांना बसला आहे.


दरम्यान, येत्या 5 दिवसात गुजरात राज्यात उष्णतेची लाट असेल 24-26 दरम्यान बिहारमध्ये, 25-28 दरम्यान मध्य महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, 26-28 दरम्यान राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भात, तर 27 व 28 एप्रिल रोजी पंजाब, दक्षिण हरियाणामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा