Breaking

राज्यात गुढीपाडवा जल्लोषात, सोन्याचांदीचे दर ‘इतके’ वाढले


मुंबई : राज्यात आज गुढीपाडवा जल्लोषात साजरा केला जातोय. गुढीपाडव्यामुळे बाजारपेठा गजबजून गेल्या असून कालच्या दरापेक्षा आज सोन्याचा दर ४५० रुपयांनी वाढला आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८ हजार १०० रुपये आहे. तर आज चांदीचा भाव ६७ हजार ६०० प्रति किलो आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक लोक सोने चांदीची खरेदी करत असतात त्यामुळे आज सोन्याचांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली.


कर्मचाऱ्याकडून बँकेतील 52 लाख रूपये किंमतीच्या सोन्यावर डल्ला


गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८ हजार १०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२ हजार ४७० प्रति १० ग्रॅम आहे. तसेच पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८हजार १८० असून तिथे २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजार ५५० रुपये झाला आहे. नागपूर मध्येही सोन्याचा वधारला आहे. नागपुरात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८ हजार १८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजार ५५० रुपये इतका आहे. तर चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७६ रुपये आहे आणि किलोचा दर ६७ हजार ६०० रुपये आहे.


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका सुरूच, सलग दहाव्यांदा वाढ


आरोग्य सल्ला : रणरणत्या उन्हात अशी घ्या त्वचेची काळजी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा