Breaking

जुन्नर : ग्रामपंचायत आंबे - पिंपरवाडी येथे शोषखड्डा मोहीम, नाम फाउंडेशनचे सहकार्य


जुन्नर : ग्रामपंचायत आंबे - पिंपरवाडी येथे मनरेगा अंतर्गत शोषखड्डा मोहीम राबवली जात आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ११० कुटुंबांना शोषण टाकी आणि पाईप चे वाटप करण्यात आले.


यावेळी बोलतांना आंबे - पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे म्हणाले, "घर तिथे शोषखड्डा केल्यामुळे विविध आजारांपासून बचाव होईल. लोकांचे आरोग्य अबाधित आणि सुदृढ राखण्यासाठी ग्रामपंचायतीचा लोकाभिमुख योजना राबविण्याचा मानस आहे.

तसेच मनरेगा अंतर्गत गाव आदर्श मॉडेल करायचे असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चालू आहे, असेही घोडे म्हणाले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच घोडे यांनी नाम फाउंडेशनचे आभार मानले. 

मनरेगा अंतर्गत एका शोषखड्डासाठी १३९० रूपये अकुशल मंजूरी मिळते. याप्रमाणे ११० शोषखड्डांसाठी १ लाख ५२ हजार ९०० रूपये मंजूरी गावातील मजूरांना मिळणार आहे. तसेच सांडपाण्यामुळे पसरणारी रोगराईला प्रतिबंध घातला जाईल, असे आदर्श काम ग्रामपंचायत आंबे - पिंपरवाडी राबवत आहे.


यावेळी सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलका काठे, सदस्य लता किर्वे, ग्रामसेवक लहू भालिंगे, रोजगार सेवक संदिप शेळकंदे, रामदास घोडे, सखाराम चिमटे इत्यादी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा