Breaking

जुन्नर : ग्रामपंचायत आंबे येथे सार्वजनिक वाचनालय सुरू


जुन्नर / शिवाजी लोखंडे :  ग्रामपंचायत आंबे (ता‌.जुन्नर) येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सरपंच मुकुंद घोडे यांच्या हस्ते करण्यात आले ‌‌.


मुकुंद घोडे म्हणाले, "आता ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षा आणि अवांतर वाचनाकडे वळत आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक विद्यार्थी गावातच असल्या कारणाने या वाचनालयाची सुरूवात करण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थी गावातच राहून अभ्यास करतील. विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घ्यावा.

उद्घाटन प्रसंगी उपसरपंच अलका काठे, ग्रामसेवक लहू भालिंगे, सखाराम चिमटे, संदीप शेळकंदे, मुरलीधर डामसे, नामदेव वाळकोळी, किरण वाळकोळी, पोपट हेमाडे, राजाराम चिमटे, रामचंद डामसे इ ग्रामस्थ व मुले - मुली उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा