Breaking


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी कारवाई, ‘या’ चार उमेदवारांना कधीच परीक्षा देता येणार नाही


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल (MPSC) आक्षेपार्ह मजकूर लिहित असाल तर सावधान. समाज माध्यमांवर केल्या जाणाऱ्या टिका-टप्पणीवर आयोगाने नजर ठेवली असून आक्षेपार्ह मजकूर लिहणार्यांवर आयोगाकडून कारवाई सुरू आहे.


विविध समाजमाध्यमांतून, प्रसारमाध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टीका केली जाते. अशा टीका करणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जाईल आणि गंभीर काही आढळल्यास परीक्षा देण्यास बंदी घालण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता आयोगाने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये विठ्ठल भिकाजी चव्हाण या विद्यार्थाला परिक्षेसाठी कायमची बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करून दिली आहे.


इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) मध्ये पदांसाठी भरती!आयोगाने 4 उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित केले आहे. त्यामध्ये नागरे शुभम भारत, रामकिशोर धनराज पवार (बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार करणे), मनोज रतन महाजन (परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन जाणे), विठ्ठल भिकाजी चव्हाण (समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ करणे) या उमेदवारांचा समावेश आहे.


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती


Indian Navy : नौदलात 12 पास उमेदवारांसाठी 2500 पदांची बंपर भरती, वेतन 69, 100 रूपये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा