Breaking

DYFI राज्य अध्यक्षपदी नंदकुमार हडळ तर राज्य सचिवपदी बालाजी कलेटवाड


नाशिक : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (Democratic Youth Federation Of India DYFI ) चे १२ वेळ राज्य अधिवेशन सुरगाणा (Surgana Nashik) येथे संपन्न झाले. या अधिवेशनात राज्य अध्यक्षपदी नंदकुमार हडळ (Nandakumar Hadal) यांची राज्य अध्यक्षपदी तर राज्य सचिवपदी बालाजी कलेटवाड (Balaji Kaletwad) यांची निवड करण्यात आली.


अधिवेशनाने ५५ जणांची नवी राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच यावेळी शिक्षणाचे बाजारीकरण आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी DYFI चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ए. ए. रहिम (A A Rahim), माजी आमदार जे. पी. गावीत (J P Gavit) , प्रिती शेखर, सुनिल वानवा, इंद्रजित गावीत, मोहन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने अधिवेशन प्रतिनिधी उपस्थित होते.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा