Breaking

क्षयरोग रुग्णविभागाच्या स्थलांतरणास विरोध, वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन


पिंपरी चिंचवड : क्षयरोग रुग्णविभागाच्या स्थलांतरणास विरोध असल्याचे निवेदन महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी तालेरा हॉस्पिटल मुख्य वैद्यकीय आधिकारी तिरुमनी मॅडम व नलावडे मॅडम यांना दिले. तसेच प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली.


क्षयरोग या आजारावरील उपचार गेल्या कित्येक वर्षे झाले तालेरा हॉस्पिटल चिंचवड येते अत्यन्त योग्य रीतीने होतात व हे रुग्ण व नागरिक यावर खूप समाधानी आहेत. परंतु अचानक प्रशासनाच्या वतीने की आणखी कोणाच्या हट्टामुळे हा क्षयरोग विभाग आकुर्डी येथे स्थलांतरित करण्याचा घाट घातला आहे हे अत्यंत दुर्दैवी व क्षयरोग रुग्णावर अन्यायकारक आहे.


काय सांगता ! व्हाट्स ॲप आता वापरकर्त्यांना पैसेही देणार


हा विभाग तालेरा मध्ये अत्यन्त उपयुक्त आहे चिंचवड विभागातून जवळपास 400 पेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत तसेच अन्य भागातून सुद्धा येणाऱ्या रुग्णांना तालेरा हॉस्पिटल हे सोईस्कर वाटत आहे असे असताना व कोणतीही आवश्यकता नसताना हा विभाग आकुर्डी येथे नेण्याचे कारणच काय हा नागरिकांना प्रश्न पडला आहे.


तसेच क्षयरोग विभाग तालेरा मध्येच राहण्यासाठी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. कोणत्याही परिस्थितीत क्षयरोग विभाग स्थलांतर करू नये अन्यथा क्षयरोग रुग्ण स्वतः या ठिकाणी आंदोलन करतील.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, 25,000 रूपये पगाराची नोकरी


आम्ही वरील सर्व परिस्थिती वरिष्ठ अधिकारी यांना सांगून क्षयरोग विभाग तालेरा हॉस्पिटल मध्येच राहील यासाठी प्रयत्न केला जाईल असे तालेरा मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले असल्याचे मधुकर बच्चे यांनी सांगितले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा