Breaking

पंतप्रधानांची करोना संदर्भात मुख्यमंत्र्यासोबत बैठक, बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान


मुंबई : देशातील मागील काही दिवसांपासून करोनाच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सावध झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा मास्क सक्तीचे संकेत दिले आहे.


पंतप्रधानांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज मुख्यमंत्री सायंकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्या मिटींगच्या अनुषंगाने कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य होऊ शकतात. असा या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्या दृष्टीने एक साधारण चर्चा झाली आहे, असे आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले.


या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, आम्ही टेस्टिंग नक्कीच वाढवू, ट्रॅकींग करू आणि गरजेप्रमाणे निश्चित उपचार करू. जर काही पॉझिटिव्ह आढळले तर ज्याबाबात जे जिनोमिंक सिक्वेन्सिंग आहे, ते देखील करायला सांगितलं. आपण लसीकरणात वाढ करणार आहोत. तसेच, सहा ते १२ वयोगटासाठी लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवावंच लागणार." असेही टोपे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा