Breaking

पुणे : गोदामाला भीषण आग, बाजूची दुकाने जळून खाक

Photo : @ANI

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील न्यू क्वार्टर गेट चौक परिसरात गोदामाला भीषण आग लागली. या आगीत बाजूची दुकाने, कारखाना जळून खाक झाला. गोदामाला लागलेल्या आगीत अग्निशमन अधिकाऱ्यासह दोन जण जखमी झाले असून आग आता नियंत्रणात आल्याचे पुणे अग्निशमन विभागाने म्हटले आहे.


सविस्तर वृत्त असे की, नाना पेठेतील आंबेडकर कॉलेज शेजारी कावेरी सोसायटी आहे़, या सोसायटीला लागून गल्लीत अनेक दुकाने, गोदाम आहेत. त्यातील एका गोदामाला रात्री साडेअकरा वाजता भीषण आग लागली. सुमारे ४ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम असून त्याच्या पुढे ३ दुकाने आहेत. या दुकानात गादीचा कारखाना, लाकडी फर्निचर, दुचाकी, चारचाकीच्या स्पेअर्स पार्ट तसेच गाड्यांसाठी लागणाऱ्या फायबरच्या पार्ट बनविणारा कारखाना आहे. अग्निशामक दलाला याची खबर रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर १० अग्निशामक दलाचे गाड्या, ३ वॉटर टँकर, ३ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले. 


हसन मुश्रीफ यांना आयकर विभाग ताब्यात घेणार ? किरीट सोमय्यांचं ट्विटसुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री १ वाजल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.


ब्रेकींग : स्वयंपाकाच्या गॅस (LPG) दरात प्रचंड वाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर गॅस दरवाढीचा भडका


इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) मध्ये पदांसाठी भरती!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा