Breaking

मोठी बातमी : राज ठाकरे यांच्या ताफ्याचा अपघात, 3 ते 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या


औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होत असून, या सभेसाठी राज ठाकरे पुण्यावरून औरंगाबादकडे निघाले असताना राज ठाकरे यांच्या ताफ्याचा अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे.


नगरमध्ये राज ठाकरे यांचे जंगी स्वागत झाले त्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना झाले. मात्र, काही अंतर गेल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 3 ते 4 गाड्या एकमेकांवर आदळल्याने अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले. 


यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे.


मोठी बातमी : मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi वर ईडीची मोठी कारवाई, 5 हजार 551 कोटींची मालमत्ता जप्त


ब्रेकिंग : बॉलिवूडच्या "या" प्रसिद्ध अभिनेत्रीवर ईडीची मोठी कारवाई, ७ कोटी २७ लाखांची मालमत्ता जप्‍त


मेगा भरती : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 862 जागांसाठी भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा