Breaking

भोंग्यासंदर्भात राज ठाकरे यांचे नवीन ट्वीट, ‘या’ ट्वीटची होतेय जोरदार चर्चामुंबई : सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यात भोंग्याच्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. अशातच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करत राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.


गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळांवरुन विशेषत: मशिदींवरून भोंगे काढण्याबाबतच्या इशाऱ्यानंतर राज्यासह देशभरात वातावरण तापलं. अशात उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी सरकारनं धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राज ठाकरेंनी ट्वीटव्दारे कौतुक केलं आहे.


शिक्षक संवर्गातील 200 बिंदू नामावली रद्द करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षची मागणी


राज ठाकरे यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेतील मजकुर ट्वीट केला आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना” असं ट्वीट ठाकरे यांनी केलं आहे. 


मशिदीवरील भोंगे हटविल्याच्या योगी सरकारच्या या निर्णयाचे राज ठाकरे यांनी कौतूक केले आहे, त्यामुळे अयोध्या दौऱ्यावेळी राज ठाकरे योगींची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे.


गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ माकपची सांगलीत निदर्शने


कृषी मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 50,000 रूपये पगाराची नोकरी
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा